महर्षी वाल्मीकी जयंती
🕉🙏🏻 नमस्कार 🙏🏻🕉
अश्विन शुद्ध पौर्णिमा ही तिथी आपल्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणून ठाऊक आहेच. पण याच दिवशी आदिकवी महर्षी वाल्मीकी यांची जयंती देखील साजरी केली जाते. वाल्मीकी ऋषी हे आदिकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीरामचंद्रांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य कर्तव्य साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. आदिकवी महर्षी वाल्मीकी यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मीकी यांना आद्यकवी असेही संबोधले जाते.
यावर्षी आपण रत्नागिरीत प्रथमच वाल्मीकी जयंती साजरी करणार आहोत. संस्कृतभारतीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने संस्कृतभारतीचे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री मा. श्री. शिरीषजी भेडसगांवकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तरी रविवार दिनांक १३/१०/२०१९ रोजी सायंकाळी ०६ ३० वाजता कै. माधवराव मुळ्ये भवन येथे वैद्य सभागृहात आपण आवर्जून उपस्थित राहावे म्हणून आपणांस हे आग्रहाचे निमंत्रण!
आपला नम्र
आशिष अनिल आठवले
जनपद सहमंत्री
संस्कृतभारती रत्नागिरी.