
पश्चिम महाराष्ट्र प्रान्तात पुणे नाशिक अहमदनगर सातारा साङ्गली सोलापुर कोल्हापुर असे सात जिल्हे मोडतात. पुणे ही तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. विद्येचे माहेरघर. संस्कृत विद्वानांची रेलचेल. संपूर्ण प्रान्तच यासारखा. अश्या प्रांतात संस्कृतभारतीचे काम नसले तरच नवल. सगळ्याच जिल्ह्यात काम आहे. पुणे व नाशिक ही दोन केंद्रे विशेष. प्रांत केंद्र आहे पुणे. नारायणपेठेत संस्कृतभारतीचे कार्यालय आहे. पत्ता आहे - A-५ ४०९ A आमोदवन सहकारी गृहनिर्माण सोसायटी नारायणपेठ पुणे - ४११०३०
ज्यांना ज्यांना संस्कृत शिकायची इच्छा आहे त्यांनी त्यांनी सोबत दिलेल्या यादीतल्या कोणाशीही संपर्क साधावा. वयाची शिक्षणाची जातीची कोणतीही अट नाही. सुरवात बोलण्यापासून होईल. नंतर लिहायला शिकविले जाईल. शेवटी शास्त्र शिकविल्या जातील. हे सर्व नि शुल्क शिकवण्यात येईल. तेंव्हा धानाभाव असलेल्यांना देखील ही संस्कृत शिकण्याची सुवर्ण संधी आहे.
S.L | Date from - to |
Time |
Venue |
Contact |
---|---|---|---|---|
1 | 21-Dec-2018 to 30-Dec-2018 | 07:00 PM | A-5 AMODBAN NARAYAN PETH MUNJABACHA BOL PUNE 411030 | 9960200769 |