Top
Samskrita Bharati - Vidarbha
संस्कृतभारती - विदर्भ:
Latest Media & News
Preview Media & News

संस्कृतभारतीच्या विदर्भ-प्रांत तसेच नागपूर महानगराच्या समितीची घोषणा संपन्न
संस्कृतभारती विदर्भ प्रांतसमितीची बैठक संस्कृतभारती चे अखिल भारतीय महामंत्री श्रीशजी देवपुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी नागपूर येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये विदर्भ प्रांताच्या तसेच नागपूरमहानगराच्या नूतन समितीची घोषणा करण्यात झाली. घोषित करण्यात आलेल्या प्रांतसमितीचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२२ असा राहील तर महानगरसमितीचा कार्यकाळ वर्षप्रतिपदा २०२२ पर्यंत राहील.
अध्यक्ष - श्री. रमेश मन्त्री व्यवसायी नागपूर उपाध्यक्ष - श्री. श्रीनिवास वर्णेकर भवन निर्माता स्थापत्य अभियंता नागपूर . मन्त्री - डॉ.भरत पण्डा प्राध्यापक महात्मा गान्धी केन्द्रीय हिन्दी विश्वविद्यालयः वर्धा. शिक्षणप्रमुखा - सौ. प्रणिता भाकरे प्राध्यापिका आयुर्वेद महाविद्यालय वणी जिल्हा - यवतमाळ. प्रचारप्रमुख - श्री. देवदत्त कुलकर्णी Hitwad Daily अमरावती. सम्पर्कप्रमुख - श्री. संजीव लाभे सेवानिवृत्त व्याख्याता वर्धा. साहित्यप्रमुख - श्री. राजाभाऊ आळशी सेवानिवृत्त नागपूर . कार्यालयप्रमुख - श्री. यशवंत देशपांडे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता नागपूर . सदस्या - सौ. मानसी दीक्षित पत्राचार-द्वारा-संस्कृत-योजना नागपूर . सदस्या - सौ. विभा क्षीरसागर प्राध्यापिका शिक्षकांचे प्रशिक्षण.
नागपूर महानगराची समिती पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली आहे. महानगर अध्यक्ष - डॉ.मोहन खेडकर (विभागप्रमुख व्हि.एन.आय.टी.नागपूर) मंत्री - डॉ. संभाजी पाटील (सहा.प्राध्यापक व्हि.एन.जी.आय.ए. एस.नागपूर) साहित्यप्रमुख - श्री. राजाभाऊ आळशी सेवानिवृत्त नागपूर सदस्या - केतकी डांगे (निरन्तरवर्ग प्रमुख) अध्यापिका पंडीत बच्छराज व्यास विद्यालय नागपूर. सदस्या - सौ.श्वेता पवनीकर (गीताकेंद्र प्रमुख) अध्यापिका - सोमलवार विद्यालय नागपूर. सदस्या - सौ.शैलजा पांडे (पत्राचार-द्वारा-संस्कृत-योजना ) सदस्य - श्री.लोकेश मेहता (प्रचार विभाग प्रमुख) अध्यापक भवन्स बी.पी.विद्या मंदिर नागपूर.
संस्कृतभारतीच्या अखिल भारतीय महामंत्री श्रीशजी देवपुजारी यांनी सर्व कार्यकर्त्यांना दायित्वबोध करून दिला तसेच शिक्षणात्मक संघटनात्मक गुणवत्तात्मक आणि व्यवस्थात्मक कार्य कसे करावे याचे बहुमोल मार्गदर्शन केले..


  • Post By : Vidarbha
  • |
  • 07-09-2021
  • |