संस्कृतभारती नागपूर महानगराच्या वतीने संस्कृत सप्ताहाचा उत्साहाने समारोप
रक्षाबंधन म्हणजेच नारळीपोर्णिमा हा दिवस विश्वसंस्कृतदिन म्हणून साजरा केला जातो. संस्कृतभारती नागपूर महानगराच्या वतीने १९ आॕगस्ट २०२१ ते २५ आॕगस्ट २०२१ पर्यंत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये अन्त्याक्षरी स्पर्धा विज्ञापन स्पर्धा चित्रवर्णन वादविवाद साभिनयवाचन श्लोक पठन पर्ववर्णन कथाकथन विनोदकणिका या स्पर्धा घेण्यात आल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी बजाज नगर लक्ष्मी नगर नरेंद्र नगर प्रियंका वाडी सोनेगाव हुडकेश्वर मेजर हेमंत जकाते पाठशाळा इत्यादी अनेक ठिकाणी शासकीय अधिकारी तसेच समाजबांधवांना राखी बांधून ‘वदतु संस्कृत’ हे पुस्तक भेट देण्यात आले आणि संस्कृत भारती संस्थेचा परिचय करून देण्यात आला. २५ आॕगस्ट ला या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन खेडकर प्रमुखवक्ता डॉ.प.नन्दकुमार (संस्कृतभारती अखिलभारतीय संपर्कप्रमुख) कार्यक्रमाचे सत्कारमूर्ति मधुभारती प्रो. मधुसूदनपेन्ना श्रीशजी देवपुजारी (संस्कृतभारती अखिलभारतीय महामंत्री) श्रीनिवास वर्णेकर डॉ. संभाजी पाटील उपस्थित होते.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सत्कारमूर्ति डॉ. मधुसूदनपेन्ना यांनी संस्कृत उपासनेचे सामर्थ्य स्पष्ट करून संस्कृत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले. डॉ. नन्दकुमार यांनी संस्कृतभारतीची प्रचारशैली अनुसरुन नागपुर महानगराचे हे प्रशंसनीय कार्य निरंतर चालावे अशी आशा करीत सर्व कार्यकर्त्यांनचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर महानगर मंत्री डॉ. संभाजी पाटील यांनी केले. अतिथींचा परिचय शैलजा पांडे यांनी करुन दिला. नागपूर महानगर अंतर्गत सुरू असलेल्या दोन्ही निरन्तर वर्गाचे उपक्रमांविषयी माहिती केतकी डांगे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन संयोजिका श्वेता पवनीकर यांनी केले तर आभार स्वाती डबीर यांनी मानले. माधुरी कोलते विद्या आळशी आणि त्यांच्या चमूने गुरुमहिमा विषयावर आधारित लघुनाटिका सादर केली. या कार्यक्रमास संस्कृतभारती नागपूरमहानगराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आभासी माध्यमाने उपस्थित होते..
- Post By : Vidarbha
- |
- 07-09-2021
- |




