Top
Samskrita Bharati - Vidarbha
संस्कृतभारती - विदर्भ:
Latest Media & News
Preview Media & News

संस्कृतभारती नागपूर महानगर शाखेचा महाकवी-कालिदास-दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न
संस्कृत भारती नागपूर महानगर शाखेचा महाकवी-कालिदास-दिन कार्यक्रम गुरुवार दिनांक १५ जुलै २०२१ रोजी ऑनलाइन माध्यमाने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष डॉ. मोहन खेडकर होते तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती येथील प्रा. रागी वेंकटाचारी होते. “उपमा कालिदासस्य” या विषयावर त्यांच्या अत्यंत विद्वत्तापूर्ण आणि श्रवणमधुर व्याख्यानाने श्रोत्यांची मने जिंकली. सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला. कालिदास-दिनाच्या निमित्ताने त्यांची जीवन यात्रा कालिदासरचित ‘मेघदूत’ या महाकाव्यातील श्लोकांचे पठन कालिदास-अष्टकाचे गायन इत्यादी भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. सौ.अनघा कुंटे यांनी अत्यंत प्रशंसनीय कालिदासगीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर मंत्री डॉ. संभाजी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सौ.शैलजा पांडे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. सोनाली नाईक यांनी केले. शांती मंत्राने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. महानगराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते..


  • Post By : Vidarbha
  • |
  • 07-09-2021
  • |